Maha Yojana Doot Registration | महा योजना दूत नोंदणी
Maha Yojana Doot Registration : महाराष्ट्र सरकार हे आपल्या राज्यातील नागरिकांसाठी विविध योजना राबवत असते. या योजनेची मनबजावणी प्रत्येक नागरिकांपर्यंत होत नाही त्यासाठी महाराष्ट्र सरकार प्रत्येक ग्रामपंचायत किंवा गावांमध्ये एक योजना दूत नेमणार आहे.
संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये शासन आपल्या दारी हा नवा कार्यक्रम सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक गावामध्ये एक योजना दूत हा नेमण्यात येणार आहे.
या योजनांचे काम काय आहे ? त्यांना लाभ कोणते मिळणार आहेत ? त्याचप्रमाणे यादी कशी पहायची ? याची सविस्तर माहिती येथे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
Maha Yojana Doot Info
योजनेचे नाव | दूत महाराष्ट्र योजना |
---|---|
यांनी पुढाकार घेतला | महाराष्ट्र सरकार |
लाँच वर्ष | 2024 |
वस्तुनिष्ठ | सरकारी योजनांची माहिती पसरवा |
पगार | अंदाजे रु. 10,000 प्रति महिना |
लाभार्थी | महाराष्ट्रातील तरुण |
Official Website | https://mahayojanadoot.org |
महायोजना दूत भरती काय आहे?
शासन आपल्या दारी ही संकल्पना प्रत्यक्ष राबवण्यासाठी प्रत्येक गावामध्ये एक योजना दूत हा नियमावा लागणार आहे. तर असे संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये 49000 पेक्षा जास्त योजना दुत हे नेमण्यात येणार आहेत.
त्यामुळे जर तुम्ही पदवीधारक असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची संधी ही उपलब्ध झालेली आहे.
योजना दूत यांचे महत्त्व काय आहे ?
महाराष्ट्र राज्यात प्रत्येक ग्रामपंचायत एक योजना दूत नेमण्यात जाईल. या योजना दूतांना सर्व सरकारी योजनांची माहिती ही प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे काम हे करायचे आहे.
योजना दूत म्हणून जे काम करतील त्यांना उत्तम अनुभव व कामाचे सर्टिफिकेट मिळणार आहे.
महत्त्वाचे मुद्दे:
- योजना दूत म्हणून निवड होण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा
- योजना दुतीयांना सर्व सरकारी योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करायचे आहे .
- ही भरती महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक गावांमध्ये एका तरुणांसाठी रोजगार निर्माण करणार आहे.
- निवड यादी ही तुम्हाला खाली उपलब्ध करून देण्यात येईल.
पात्रता
- वयोमर्यादा १८ ते ३५ वयोगटातील उमेदवार.
- शैक्षणिक अर्हता- कोणत्याही शाखेचा किमान पदवीधर.
- उमेदवाराला संगणक ज्ञान आवश्यक.
- उमेदवाराकडे अदययावत मोबाईल असणे आवश्यक.
- उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक.
- उमेदवारांचे आधार कार्ड असावे व त्याच्या नावाचे बँक खाते आधार संलग्न असावे.
फायदे
- प्रत्यक्ष कामाचा अनुभव.
- सामाजिक बदलाचा भाग बनण्याची संधी.
- विद्यावेतनातून युवकांना आर्थिक साहाय्य.
- शिकण्याबरोबरच कौशल्य विकास.
- सरकारी कामकाजाचा अनुभव.
जिल्हा माहिती अधिकारी नोंदणी
- योजनादूत पोर्टलवर DIO नोंदणीवर क्लिक करा.
- अधिकृत व्यक्तीची माहिती प्रविष्ट करा.
- अनिवार्य माहिती प्रविष्ट करा आणि अर्ज सबमिट करा.
- सत्यापित करण्यासाठी तुमच्या ईमेल पत्त्यावर OTP मिळवा.
- तुम्ही आपोआप लॉग इन व्हाल. प्रत्येक वेळी लॉग इन करण्यासाठी तुम्हाला तोच ईमेल आयडी वापरावा लागेल.
- एकदा तुमचे प्रोफाइल मंजूर झाले की तुम्ही रिक्त जागा टाकू शकता
उमेदवार नोंदणी
- योजनादूत पोर्टलवर ‘उमेदवार नोंदणी’ वर क्लिक करा.
- पात्रतेशी संबंधित आवश्यक कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा.
- नोंदणीकृत आधार क्रमांक एंटर करा आणि OTP पाठवलेल्या फोनची पडताळणी करा.
- सत्यापनानंतर तुमचा आधारभूत तपशील प्रविष्ट करा आणि तुमच्या ईमेल आणि मोबाईल बरोबर असल्याची खात्री करा.
- तुमचा पासवर्ड बनवा आणि पुन्हा लॉगिन करिता नोंद करुन ठेवा. तुम्ही आपोआप लॉग इन व्हाल. प्रत्येक वेळी लॉग इन करण्यासाठी तुम्हाला तोच ईमेल आयडी वापरावा लागेल.
- तुमची शैक्षणिक पात्रता प्रविष्ट करा आणि संबंधित कागदपत्रे संलग्न करा.
- रिक्त जागा तुम्हाला दाखवल्या जातील. तुम्ही ते फिल्टर करू शकता आणि त्यासाठी अर्ज करू शकता.
योजना दूत अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे
अर्ज प्रक्रियेदरम्यान अर्जदारांनी खालील कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे:
- आधार कार्ड
- वय प्रमाणपत्र
- पत्ता पुरावा
- शैक्षणिक पात्रतेची कागदपत्रे
- बँक खाते पासबुक
- ईमेल आयडी
- मोबाईल नंबर
- पासपोर्ट आकाराचा फोटो